गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आंबा फळपिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी योग्य छाटणी नियोजन करणे आवश्यक!
आंबा बागा फार जुन्या झाल्यानंतर त्याची उत्पादकता घटते. त्याचप्रमाणे फळांचा आकारदेखील लहान होतो. अशा परिस्थितीत त्याच बागांचे उत्पन्न वाढविण्यासाठी छाटणी तंत्राचा योग्य प्रकारे वापर करणे आवश्‍यक असते तर, आज आपण 'आंबा फळबाग छाटणीचे महत्व आणि फायदे' याबाबत प्रगतशील महिला शेतकरी 'जयश्रीताई मदने' यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेणार आहोत. जुन्या आंबा बागांची उत्पादकता का घटते? जुन्या बागामध्ये आंबा झाडांचा घेर मोठा झाल्याने सूर्यप्रकाश आतपर्यंत व्यवस्थित पोचत नाही. परिणामी नवीन पालवी फारच कमी येते. या जुन्या आंबा बागेमध्ये कीडनाशके व संजीवके यांची फवारणी करणेही कठीण जाते. परिणामी रोग व किडीचे नियंत्रण योग्य प्रकारे न झाल्याने मोहोर, तसेच फळ गळतात.या बागांमधील झाडे फार उंच वाढलेली असल्याने फळे काढणे व तत्सम कामे करणे जिकिरीचे होते. फांद्यांना अन्नपुरवठा न झाल्याने फांद्या सुकतात. आंब्याची सघन किंवा अतिसघन लागवड पद्धत . सघन पद्धतीत दोन ओळीतील आणि झाडांमधील आंतर कमी केले जाते. सघन लागवडीमुळे एकरी झाडांची संख्या वाढते. उत्पादनात 2.5 ते 4 पट वाढ होते. दोन झाडातील अंतर कमी असल्याने सुरवातीपासूनच आपणाला झाडाची छाटणी करून कलमांचा सांगाडा तयार करावा लागतो . छाटणी करण्याचे फायदे : · झाडे उंचीला ठेंगणी राहिल्याने छाटणी व विरळणी करणे सुलभ जाते. · झाडाच्या सर्व भागांवर फवारणी करणे शक्य झाल्याने रोग व किडीचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते. · झाडांची वाढ आटोपशीर ठेवल्याने झाडाच्या सर्व भागांना सूर्यप्रकाश मिळतो आणि फळांची काळजी घेणे सोपे होते, त्यामुळे फळांच्या गुणवत्तेत वाढ होते. · झाडे ठेंगणी राहिल्याने फळ काढणी सुलभ होते आणि पक्व फळे हाताने किंवा झेल्याने देठासह सहज काढता येतात. त्यामुळे काढणी करताना होणारे फळांचे नुकसान कमी होते. अशी फळे निर्यातक्षम असतात. छाटणी करण्याची पद्धत फांद्या तोडताना झाडांना छत्रीसारखा (डोम) आकार द्यावा. फांद्या तोडताना झाडांची साल निघणार नाही, फांदी पिचणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी छाटणी धारदार हत्याराने करावी. आंबा बागांच्या छाटणी करण्याचा कालावधी झाडांची छाटणी दोन हंगामामध्ये करता येते. छाटणी फेब्रुवारी-मार्च महिन्यात करावी. म्हणजे नवीन आलेली पालवी पावसात सापडत नाही किंवा छाटणी सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात केल्यास त्यानंतर पडणाऱ्या थंडीचा कोणताही वाईट परिणाम नवीन पालवीवर झाडांना होत नाही. छाटणी केल्यानंतर पालवी लवकर व भरपूर येण्यासाठी शक्‍य झाल्यास झाडांना युरिया खताची मात्रा, तसेच पाणी द्यावे. यामुळे जोमदार पालवी येते. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
4
इतर लेख