AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा पिकासाठी खत व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आंबा पिकासाठी खत व्यवस्थापन!
शेतकरी बंधूंनो, आंबा पिकासाठी व्यवस्थापन कशा प्रकारे करावे याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन महिला प्रगतशील शेतकरी जयश्री मदनेयांच्या द्वारे जाणून घेऊया. ➡️ झाडाच्या जोमदार वाढीसाठी झाडाच्या वयोमानानुसार आणि त्याच्या आवश्यतेनुसार झाडाला खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ➡️ झाडाच्या वाढीसाठी मुख्यअन्नद्रव्य (जसे की नत्र, स्फुरद, पालाश), सूक्ष्म अन्नद्रव्ये (झिंक, फेरस, बोरॉन, कॉपर इ.) तसेच दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य (गंधक, कॅल्शियम,मॅग्नेशियम) यांची गरज असते .झाडाच्या सर्वांगीण विकासाठी संतुलित खतव्यवस्थापन महत्वाचे असते. ➡️ झाडाला खत देण्यापूर्वी मातीपरीक्षण करून घ्यावे आपल्या मातीत कशाची कमतरताआहे हे समजेल. ➡️ झाडांना सेंद्रिय व रासायनिक दोन्ही प्रकारची खते द्यावीत पण त्यात सेंद्रिय चे प्रमाण जास्त असावे . ➡️ झाडांना रासयनिक खत झाडाच्या खोडाजवळ किंवा मुळालगत द्यायचे नाही. खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर बुजवून टाकावी. १ वर्षाचं झाड आहे तर झाडाला 👉 १ पाठी शेणखत ( कुजलेले ) 👉नत्र (युरिया) ३०० ग्रॅम 👉 स्फुरद (सिंगल सुपर फॉस्पेट ) ३०० ग्रॅम 👉 पालाश ( म्युरेट ऑफ पोटॅश )२०० ग्रॅम 👉सूक्ष्म अन्नद्रव्ये ५० ग्रॅम हा संपूर्ण डोस तुम्हाला तीन टप्प्यात द्यायचा आहे. टप्पा १ : जून महिन्यामध्ये झाडाला १ पाठी शेणखत आणि नत्र द्यायचे आहे ते पण अर्धे नत्र ( १५० ग्रॅम )महिन्यातून एकदा जीवामृत द्यायचं आहे. टप्पा २ : ऑगस्ट पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज घेऊन स्फुरद (३०० ग्रॅम ) + पालाश (२०० ग्रॅम )+ निंबोळी पेंड द्यावी ४ दिवसांनी जिवाणू स्लरी द्यावी. टप्पा ३ : ऑक्टोबर पहिल्या आठवड्यात राहिलेलं अर्ध नत्र ( १५० ग्रॅम ) आणि सूक्ष्म अन्नद्रव्य अश्या पद्धतीने झाडाचं वय पाहून झाडाला खत व्यवस्थापन करावे . मोठ्या झाडांना वर्षातून एकदा संपूर्ण खताचा डोस द्यावा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
11
इतर लेख