AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा पिकामध्ये काडीची परिपक्वता!
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
आंबा पिकामध्ये काडीची परिपक्वता!
आज आपण आंबा पिकामध्ये काडीची परिपक्वता ​याविषयी प्रगतशील महिला शेतकरी 'जयश्रीताई मदने' त्यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेणार आहोत. ➡️ काडी मध्ये C:N रेशो नियंत्रित असेल तर त्या काडी वर येणारी पालवी मोहर व फळधारणा जोमदार येते. काडीमध्ये अन्नद्रव्य साठवण चांगली असल्याने फळगळ फुलगळ होत नाही तसेच सेटिंग चांगली होते. आंबा पिकामध्ये अधिक उत्पादनासाठी काडीची परिपक्वता खूप गरजेचे आहे. काडी परिपक्वता न होण्याचे कारणे ➡️ नवीन पालवी वर होणारा कीड रोगांचा प्रादुर्भाव यामध्ये मुख्यतः तुडतुडे ,शेंडा पोखरणारी आळी ,पानांवरील करपा ,भुरी रोग ,लाल कोळी ,मीज माशी, फुलकिडे ➡️ खतांचे असंतुलित नियोजननवीन होणार्या फुटव्यांची गर्दी ढगाळ वातावरण कमी सूर्यप्रकाश,सततच्या पावसामुळे मुळांची कार्यक्षमता थांबणे जमिनीतील आणि पाण्यातील क्षारांची समस्या ➡️ जमिनीत जर चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास किंवा पाण्याची प्रत खराब असल्यास किंवा जमिनीत सोडियमचे प्रमाण वाढल्यास मुळांद्वारे पालाशचे शोषण कमी होते काडीच्या परिपक्वतेसाठी उपाय योजना➡️ किड रोग नियंत्रणासाठी वेळच्यावेळी तसेच प्रतिबंधात्मक नियोजन महत्त्वाचे आहे. खतांचा वापर योग्य प्रमाणात करावा संतुलित नियोजन महत्त्वाचे आहे. विरळणी केल्यानंतर एक टक्के बोर्डो पेस्ट ची फवारणी करावी. ढगाळ वातावरणात सिलीकॉन युक्त औषधांची फवारणी करावी. मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी टाटा रॅली गोल्ड नावाचे औषध 200 ग्रॅम प्रति एकर ठिबक मधून द्यावे. तसेच खतांमधून रूट पावर नावाचे औषध 600 ग्रॅम प्रती एकर प्रमाणे द्यावे. काडी परिपक्व ते साठी प्रमुख अन्नद्रव्य पालाश व स्फुरद गरजेचे असते. 0:52:34 आणि 0:0:50 पाच किलो प्रती एकर एका आठवड्यामध्ये ठिबक मधून द्यावे आणि जर फवारणी मधून घेत असाल तर 5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे घ्यावे. जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास शेणखतात सल्फर 6 किलो प्रति एकर प्रमाणे विस्कटून द्यावे. ज्या बागेत चुनखडी आणि सोडियम या दोन्हींचे प्रमाण जास्त आहे अशा बागेत फक्त सल्फर जमिनीत शेणखतात मिसळून द्यावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
5
इतर लेख