AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा पिकातील मोहर अवस्थेतील नियोजन!
गुरु ज्ञानAgroStar
आंबा पिकातील मोहर अवस्थेतील नियोजन!
👉🏻सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आंबा पिकात मावा, तुडतुडे, मिजमाशी, भुरी आणि करपा यांसारख्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे मोहोर गळण्याचे प्रमाण वाढते, परिणामी उत्पादनात घट होते. यावर प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 👉🏻पहिली फवारणी: कीड नियंत्रणासाठी थायोमिथॉक्साम घटक असलेले क्रुझर कीटकनाशक @0.5 ग्रॅम आणि रोग नियंत्रणासाठी कार्बेनडॅन्झिम 12% + मॅंकोझेब 63% डब्लूपी घटक असलेले मँडोझ बुरशीनाशक @2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 👉🏻दुसरी फवारणी: परागीकरण वाढवून मोहोर गळ कमी करण्यासाठी नॅनोवीटा CA 11 @1.5 मिली व नॅनोवीटा B 10 @1.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 👉🏻लाभ: - किडी व रोगांचे प्रभावी नियंत्रण. - मोहोर गळ कमी होऊन परागीकरण सुधारते. - फुलांची टिकवणक्षमता वाढते व उत्पादनात सुधारणा होते. 👉🏻यामुळे आंबा पिकाचे संरक्षण करून अधिक उत्पादन घेतले जाऊ शकते. योग्य वेळी उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येते. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0
इतर लेख