सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आंबा पिकातील पाणी व्यवस्थापन
➡️शेतकरी बंधूंनो, आंबा पिकातील पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करावे याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन महिला प्रगतशील शेतकरी जयश्री मदने यांच्या द्वारे जाणून घेऊया. ➡️शेतकऱ्यांकडून याच महत्त्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष होत असते. ➡️पाणी व्यवस्थापनाचा झाडांच्या वाढीवर तसेच उत्पादनावरही परिणाम होत असतो. ➡️जमिनीच्या प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन करावे. हंगामानुसार नियोजन 2. हिवाळा -ऑक्टोबर हीट असते पाण्याचा थोडा ताण द्यावा यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढते आणि झाडांचा रूट झोन वाढतो हिवाळ्यात दोन दिवसातून पाच लिटर पाणी प्रति झाड याप्रमाणे द्यावे. 3 उन्हाळा -उन्हाळ्यात झाडांना पाण्याची गरज जास्त असते त्यासाठी एक दिवसाआड प्रति झाड पाच लिटर याप्रमाणे पाणी द्यावे पाण्याचा ताण बसू नये. ➡️कोरडवाहू फळबाग असेल तर शेतात पाणी जिरवण्यासाठी चर करावेत . ➡️माती वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. ➡️बागायती फळबागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी . ➡️अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी जमिनीचा उतार बघून चर खोदावे . ➡️जमिनीतून पाणी काढून द्यावे अन्यथा मुळी अकार्यक्षम होते आणि झाडांची पाने पिवळी होतात मूळ कूज होते. ➡️मुळी कार्यक्षम असाव्यात यासाठी खालीलप्रमाणे औषधांचा वापर करावा. ➡️टाटा रॅलीगोल्ड - 8 किलो / एकर , पॉवर जेल – 1 किलो /एकर बहार नियोजनातील फळबागांमध्ये पाणी व्यवस्थापन ➡️पावसाळ्यात जर पाऊस चांगला झाला असेल तर पाण्याची आवश्यकता नाही जर दोन पावसामध्ये खूपच खंड असेल तर त्यावेळी झाडाच्या विस्तारानुसार व वयानुसार पाणी द्यावे . सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत फळधारणा येत असणाऱ्या भागांना आठवड्यातून एकदा पाणी द्यायचे आहे , झाडाला ताण बसणे आवश्यक आहे. ➡️नोव्हेंबर ते मार्च मोहर निघाल्यानंतर फळ वटाणा आकाराची झाल्यानंतर हळूहळू पाणी वाढवायचे आहे. ➡️फळांच्या वाढीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. ➡️पाणी जर झाडाला कमी-जास्त केले तर यामुळे फळगळ होऊ शकते. ➡️आंबा परिपक्व झाला की पाणी बंद करायचे यामुळे आम्हाला लवकर काढणीस येतो. यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3
इतर लेख