AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा पिकातील तुडतुडे (हॉपर्स) किडीचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाकृषी विभाग महाराष्ट्र शासन
आंबा पिकातील तुडतुडे (हॉपर्स) किडीचे नियंत्रण!
सध्या आंबा मोहोर आणि फळधारणा अवस्थेत असून सध्याच्या वातावरणाचा विचार केल्यास आंबा हॉपर (तुडतुडे) किडीचा प्रादुर्भाव होण्याची सर्व शक्यता आहे. या किडीची पिल्ले व पुर्ण वाढलेले तुडतुडे कोवळी पाने, मोहोर व छोट्या फळांच्या देठातून रस शोषतात. यामुळे पाने वेडीवाकडी होतात, पालवी कोमेजते, मोहोर गळतो. तसेच छोटी फळेही गळतात. मोहोराच्या वेळी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. किडीच्या नियंत्रणासाठी बागेत पुरेसा सुर्यप्रकाश राहील अशा प्रकारे फांद्यांची विरळणी करावी. वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करुन तुडतुडे पिलांच्या अवस्थेत असतानाच डायमेथोएट ३० ई.सी (१० मिली/१० ली) किंवा मेनिट्रोथिऑन (५० ई.सी (१० मिली/१० ली) कीटकनाशकाची फवारणी करावी. संदर्भ - कृषी विभाग महाराष्ट्र शासन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
8
इतर लेख