AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा पिकातील तुडतुडे कीड नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
आंबा पिकातील तुडतुडे कीड नियंत्रण!
🌱तुडतुडे लहान तसेच पूर्ण वाढलेल्या कोवळ्या पानांतील व विशेषतः मोहरातील रस शोषून घेतात. परिणामी फळ धारणेपूर्वीच मोहोर गळून जातो. हे कीटक मधासारखा एक चिकट पदार्थ मोहोरावर आणि पानावर टाकतात त्यामुळे यावर काळी बुरशी जमा होते. तुडतुड्यांचा मोठ्या प्रमाणत प्रादुर्भाव झाल्यास आंब्याचे 50 % पर्यंत नुकसान होते. यावर उपाययोजना म्हणून झाडाच्या आतील फांद्यांची विरळणी करावी जेणेकरून सूर्यप्रकाश आतमध्ये पोहचेल व हवा खेळती राहील. जास्त पालवी व फांद्या झाल्यास असे वातावरण तुडतुड्यांचा वाढीसाठी पोषक असते. किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास थायामेथोक्सम 25% WG घटक असणाऱ्या क्रुझर कीटकनाशकाची @40 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
0