किडींचे जीवनचक्रसेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबप्रॉपिकल हॉर्टिकल्चर
आंबा पिकांमधील पिठ्या ढेकूण किडीचे जीवनचक्र!
आंबा पिकातील प्रमुख किडींपैकी हि एक कीड आहे. _x000D_ अंडी अवस्था:- खोडाच्या भोवतालच्या मातीत अंडी दिली जातात. मातीच्या प्रकारात बदल असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यात (डिसेंबर ते जानेवारी) वेगवेगळ्या कालावधीत अंडी दिली जातात._x000D_ पिल्ले अवस्था:- अंडी उबवल्यानंतर गुलाबी तपकिरी रंगाची पिल्ले झाडावर आढळून येतात._x000D_ प्रादुर्भाव असण्याची लक्षणे:- पिल्ले व प्रौढ पतंग पिकाच्या पान, शिरा आणि फुलातून रसशोषण करतात. हि कीड गोड मधासारखा काळा चिकट द्रव स्त्रवत असल्याने यावर काळ्या बुरशीची वाढ होते. यामुळे पाने, फुले काळे आणि चिकट होतात._x000D_ _x000D_ पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण:- _x000D_ पर्यावरण पोषक नियंत्रण: झाडाच्या बुंध्याशी जमिनीपासून सुमारे ३० सेमी उंचीवर पॉलिथिलीन शीट्स (४०० गेज, ३० सेमी रुंद) बांधावी व पॉलिथीच्या काठाला ग्रीस लावावे._x000D_ रासायनिक नियंत्रण :- तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार क्लोरपायरिफॉस २० ईसी २.५ मिली/ लीटर किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यूएससी १.५ मिली/ लिटर या फवारणीद्वारे किडीचे नियंत्रित करता येते._x000D_
संदर्भ:- सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबप्रॉपिकल हॉर्टिकल्चर_x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
30
9
संबंधित लेख