किडींचे जीवनचक्रICAR-CISH, लखनऊ
आंबा खोड अळीचे जीवनचक्र
हि एक संपूर्ण देशभरात आढळणारी आंब्याची एक प्रासंगिक परंतु अत्यंत हानिकारक कीड आहे. तसेच अंजीर, रबर, जॅक, नीलगिरी इत्यादी पिकांवर देखील प्रादुर्भाव आढळून येतो. हे बीटल जुलै-ऑगस्टमध्ये दिसून येतात. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान मध्यम तापमान आणि मध्यम आर्द्रता असल्यास याचा प्रादुर्भाव वाढतो. जीवनचक्र:- • या किडीचा अंडी कालावधी ७-१३ दिवस असतो. • अळी अवस्था ते कोषावस्था हा कालावधी साधारणतः १४० - १६० दिवसांचा असतो. • जमिनीमध्ये कोषावस्था सुमारे २०-२५ दिवस असते. • प्रौढ अवस्था साधारणतः १२० -२७० दिवसांत दिसून येते. • एका वर्षात या किडीची एकच पिढी असते.
व्यवस्थापन:- _x000D_ • बाग तणमुक्त स्वच्छ ठेवावी._x000D_ • लोखंडी तर/ हुकचा वापर करून संक्रमित खोडांच्या छिद्रातून यांत्रिकी पद्धतीने अळी बाहेर काढावी._x000D_ • प्रादुर्भावग्रस्त फांद्यांची छाटणी करून नष्ट कराव्या._x000D_ • छिद्र साफ करून डायक्लोरोव्हॉस ७६ ईसी (५ मिली / लिटर) च्या द्रावणात सूती वात भिजवून छिद्रामध्ये घालावी आणि हे छिद्र चिखल किंवा शेणाने बंद करावे._x000D_ संदर्भ: ICAR-CISH, लखनऊ_x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_
15
0
इतर लेख