AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरपीक घेताय ना? मग हे कराच!
गुरु ज्ञानAgrostar
आंतरपीक घेताय ना? मग हे कराच!
🌱आंतर पीक घेण्यापूर्वी खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. 1. एकाच वर्गातील पिके आंतर पिके म्हणून निवडू नये उदा. वेलवर्गीय पिकात वेलवर्गीय पीक घेणे. मिरची पिकात, टोमॅटो, वांगी, भेंडी घेणे अथवा मका, पिकात ज्वारी, गहू घेणे, कापूस पिकात भेंडी व इतर भाजीपाला पीक घेणे टाळावे. जेणेकरून पीक कीड व रोग यांना बळी पडणार नाही तसेच जमिनीची गुणवत्ता देखील खालावणार नाही. 2. जास्त कालावधीच्या पिकात कमी कालावधीच्या पिकाची निवड करणे. उदा. ऊस पिकात कोबी, फुलकोबी, कलिंगड भुईमूग, बटाटा यांसारख्या कमी कालावधीच्या पिकाची लागवड करणे. 3. जास्त खोलवर मुळे जाणाऱ्या पिकात कमी खॊलवर मुळे जाणारी पिकाची निवड करावी. भुईमूग,चवळी सोयाबीन, हरभरा यांसारख्या द्विदल पिकात मका, ज्वारी यांसारखी एकदल पिके घ्यावी. जेणेकरून एकदल पिकांना द्विदल पिकांपासून नत्र मिळते. 4. पपई सारख्या पिकात मिरची, भेंडी किंवा इतर वेलवर्गीय पिकांची एकत्र लागवड करून नये. कारण ह्या सगळ्या पिकांचे रस शोषक कीड व व्हायरस रोगामुळे जास्त नुकसान होते. 5. शक्य झाल्यास सरळ व उंच वाढणाऱ्या पिकात बुटके व पसरट वाढणाऱ्या पिकाची निवड करावी. उदा. नारळ, सुपारी, साग यांसारख्या पिकात हळद, आले, मका, कांदा यांसारखी पिके घेतल्यास दोन्ही पिकास वाढीसाठी पुरेपूर जागा, हवा व सूर्यप्रकाश मिळतो. जेणेकरून दोन्ही पिकांपासून चांगले उत्पादन घेणे शक्य होते. 6. सुरुवातीच्या काळात बहार धरण्यापूर्वी लिंबूवर्गीय, डाळिंब, द्राक्षे, पेरू, सीताफळ यांसारख्या फळपिकात पालेभाज्या, सोयाबीन, भुईमूग, कांदा यांसारखी पिके घ्यावी. 7. आंतर पीक घेताना पिकात तणनाशकाचा वापर करणे टाळावे. जेणेकरून दुसऱ्या पिकाचे तणनाशकांमुळे नुकसान होणार नाही. 8. मुख्य पिकातील रस शोषक कीड, सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी झेंडू सारख्या पिकांची आंतर पीक म्हणून निवड करावी. 9. आंतरपीक म्हणजे मुख्य पिकाला सूर्यप्रकाश, अन्नद्रव्ये, पाणी व हवा यासाठी स्पर्धा असते. या बाबीचा विचार करून आपल्याला सर्वच नियोजनात आवश्यक ते बदल आणि वाढ करणे आवश्यक बाब आहे. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
0