गुरु ज्ञानAgroStar
अश्या पद्धतीने तयार करा भात पिकासाठी रोपवाटिका!
🌱एक एकर भात लागवडीसाठी किमान 4 गुंठे क्षेत्रावर भाताची रोपवाटिका करावी. सुरुवातीला जमिनीची उभी आडवी नांगरट करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत मिक्स करून घ्यावे. त्यानंतर बियाणे पेरणीकरिता 1 ते 1.20 मीटर रुंद व 10 ते 15 सेंमी उंच आणि आवश्यकततेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफ्यामध्ये 2 किलो निंबोळी पेंड, युरिया 150 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट 250 ग्रॅम, राख 250 ग्रॅम व्यवस्थित मिश्र करून द्यावे.
🌱खोडकिडीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी फिप्रोनिल 0.3% जीआर घटक असणारे ॲग्रोनिल जीआर 1 किलो 4 गुंठे क्षेत्रासाठी वापरावे. पुढे पेरणी साठी संकरीत जातींसाठी 8 किलो निरोगी प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे. बियाण्याची पेरणी ओळीत व विरळ करावी आणि बियाणे बेड मध्ये जास्त खोलवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर वाफ्यात बी पेरल्यापासून ते उगवेपर्यंत जमिनीत पुरेशी ओल ठेवावी.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.