AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अश्या पद्धतीने तयार करा भात पिकासाठी रोपवाटिका!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
अश्या पद्धतीने तयार करा भात पिकासाठी रोपवाटिका!
➡️ एक एकर भात लागवडीसाठी किमान 4 गुंठे क्षेत्रावर भाताची रोपवाटिका करावी. सुरुवातीला जमिनीची उभी आडवी नांगरट करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत मिक्स करून घ्यावे. त्यानंतर बियाणे पेरणीकरिता 1 ते 1.20 मीटर रुंद व 10 ते 15 सेंमी उंच आणि आवश्यकततेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफ्यामध्ये 2 किलो निंबोळी पेंड, युरिया 150 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट 250 ग्रॅम, राख 250 ग्रॅम, कार्बोफ्युरॉन 30 ग्रॅम व्यवस्थित मिश्र करून द्यावे. पुढे पेरणी साठी संकरीत जातींसाठी 8 किलो निरोगी प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे. बियाण्याची पेरणी ओळीत व विरळ करावी आणि बियाणे बेड मध्ये जास्त खोलवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर वाफ्यात बी पेरल्यापासून ते उगवेपर्यंत जमिनीत पुरेशी ओल ठेवावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
8