AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अवघ्या 26 हजारात न्या बजाज पल्सर 150!
ऑटोमोबाईलTV9 Marathi
अवघ्या 26 हजारात न्या बजाज पल्सर 150!
➡️पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत.अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. बजाज पल्सर १५० असे या बाईकचे नाव आहे. ➡️पल्सर १५० ला तिच्या डिझाइनसाठी प्राधान्य दिले जाते. जर तुम्ही आज शोरूममध्ये हे वाहन खरेदी करायला गेलात तर तुम्हाला १.१५ लाख रुपये इतकी किंमत मोजावी लागेल. परंतु आज आम्ही घेऊन आलेल्या ऑफरच्या मदतीने तुम्ही हे वाहन कमी किंमतीत घरी आणू शकता. ही ऑफर प्राईस २६ हजार रुपये इतकी आहे. होय, आपण ही बाईक केवळ २६००० रुपयांत खरेदी करु शकता. ➡️या बाईकच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी दावा करते की, ही बाईक ६५ किमी / लीटर इतकं मायलेज देते. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, CARS24 ही वेबसाईट जी सेकंड हँड वाहने खरेदी करते आणि विकते, या कंपनीच्या साइटवर ही पल्सर १५० सूचीबद्ध केली आहे. त्यावर या बाईकची किंमत २६ हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ➡️वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बाईकचे मॉडेल २००९ चे आहे. ही फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक आतापर्यंत ६५,१३४ किलोमीटर धावली आहे. बाईकची नोंदणी दिल्लीच्या DL-06 RTO ची आहे. आपल्याला या बाईकच्या खरेदीवर १ वर्षाची वॉरंटी आणि ७ दिवसांची मनी बॅक गॅरंटीसह मिळते. महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
8