AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अवकाळी पावसाचा कापसाला फटका!
कृषी वार्ताAgrostar
अवकाळी पावसाचा कापसाला फटका!
🌱खरीप कापूस काढणीवेळी आलेल्या परतीच्या पावसाने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मंडईत शेतमालाला भाव मिळत नाही तर कधी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. पण सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या दोन्ही समस्यांना तोंड देत आहेत. 🌱या पावसात तयार झालेले पीक खराब झाल्यामुळे अधिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर नवीन कापसाला प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये भाव मिळत आहे. 🌱शेतकऱ्यांनी कापसाची काढणी सुरू करताच असतानाच अवकाळी पावसामुळे अर्ध्याहून अधिक पीक खराब झाले. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आणि अद्यापपर्यंत नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा झाला नाही.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान कसे भरून काढणार.कापसाची आवक कमी असूनही बाजारात कमी भाव मिळत आहे. अशा स्थितीत सुरुवातीला हीच परिस्थिती असल्याने पुढे काय होणार, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही शेतकरी आतापासून कापूस साठवण्यावर भर देत आहेत. 🌱राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही अनेक जिल्ह्यांचा दौरा केला होता. पंधरा दिवसांत मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचेल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 🌱संदर्भ:Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
1
इतर लेख