सल्लागार लेखTV9 Marathi
अवकाळीनंतर ‘असे’ करा फळबागांचे व्यवस्थापन!
➡️वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसत आहे.
ऐन पिक पदरात पडण्याच्या दरम्यानच राज्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान हे आंबा आणि द्राक्षे बागांचे होत आहे. त्यामुळे या बागांचे व्यवस्थापन झाले तरच शेतकऱ्यांना उत्पादन हाती लागणार आहे.
द्राक्ष बागांवर काय झाला आहे परिणाम
➡️द्राक्ष बागा ह्या तोडणीच्या अवस्थेत आहेत. सध्या फुलोरा आणि मणी सेटिंग नंतरची स्थिती आहे. सध्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. तर द्राक्षांवर फळकूज, मणीगळ, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर उपाययोजनेसाठी हेक्झाकोनॅझोल ५ टक्के घटक असेलेले हेक्सझा १ मिली प्रति लिटर फवारणी करावी.
द्राक्ष बागांचे असे करा व्यवस्थापन
➡️सध्याच्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे भुरी व केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बागेत मोकळी कॅनोपी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सूक्ष्म वातावरण निर्माण होणार नाही. सर्वसामान्य दाट कॅनॉपीमधे रोगकारक घटकांची वेगाने वाढ होते व त्याचा प्रसार घडापर्यंत होतो. हे टाळणासाठी प्रत्येक काडी सुटसुटीत राहील याकडे लक्ष गरजेचे आहे.
➡️बागेमध्ये काड्या तारेवर बांधून घ्याव्यात. काडीवर निघालेल्या बगलफुटीसुद्धा काढून घ्याव्या लागणार आहेत. त्याचबरोबर काडीच्या तळातील ३ ते ४ पाने काढून दोन फांद्या दरम्यान योग्य अंतर ठेवले तर वेलीमध्ये योग्य हवा खेळती राहणार आहे. त्यामुळे फवारणी पूर्ण कॅनॉपीमध्ये होईल सूर्यप्रकाश प्रत्येक भागाला मिळाल्यामुळे रोगांच्या प्रसारास आळा घालता येईल पानाच्या पृष्ठभागावर बुरशीनाशक, धूळ किंवा स्टिकरचा लेप तयार होऊ देऊ नये. शिवाय द्राक्षाची पाने निरोगी व रोगमुक्त ठेवावी लागणार आहेत.
आंबा मोहरावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
➡️पावसामुळे आंब्यावर कीड, रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसानंतर वातावरण ढगाळ राहिल्यास आंब्याच्या पालवी मोहोरावर तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढी शकतो. त्यामुळे पावसाने उघडीप दिली की क्रूझर ( थायोमेथोक्साम २५ % )प्रमाण - ०.५ ग्रॅम / लिटर याप्रमाणे फवारणी करावी.
➡️वातावरणातील बदलामुळे आंब्यावर भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. याकरिता बुरशीनाशकांचा वापर करणे हे अनिवार्य आहे. यामध्ये हेक्झाकोनॅझोल ५ टक्के घटक असेलेले हेक्सझा १ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा ८० टक्के सल्फर हे भुरा रोगापासून आंब्याचे संरक्षण होईल. भुरी आणि करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी बुरशीनाशकांचा वापर महत्वाचा राहणार आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिली की, शेतकऱ्यांनी याची फवारणी करणे गरजेचे आहे.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- TV9 Marathi
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.