योजना व अनुदानAgrostar
अवकाळीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार निधी
✅ नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या महिन्यात अवेळी पाऊसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शासनाने निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
✅ गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
✅ अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.
✅ मात्र नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
✅संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.