गुरु ज्ञानAgrostar
अळ्या शेंगा पोखरत आहेत का?
🌱सोयाबीन पिकावर सद्यस्थितीत शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वातावरण ढगाळ असताना या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. सुरवातीस अंड्यातून बाहेर पडलेली लहान अळी सोयाबीनची कोवळी पाने खाते. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळ्या, फुले खाते. नंतर शेंगांना छिद्र पाडून आत शिरते. शेंगेतील अपरिपक्व तसेच परिपक्व झालेले दाणे खाऊन टाकते.
🌱अळीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येते. यावरील नियंत्रणासाठी क्लोरनट्रेनिलीप्रोल 18.5% एससी घटक असणारे रॅपीजन अळीनाशक @60 मिली प्रति एकर फवारणी करावी.
🌱संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.