क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोवन
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग चेंबर!
➡️ तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राने छोट्या केळी पिकवणगृहाचा अर्थात ‘रायपनिंग चेंबर’ कक्षाचा प्रसार केला आहे. अल्पभूधारकांची गरज लक्षात घेऊन किफायतशीर किंमतीचे, कमी जागेत मावणारे व २४ तासात केळी पिकवणारे हे चेंबर आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील निवडक शेतकऱ्यांकडे त्याची प्रात्यक्षिके यशस्वी झाली आहेत. ➡️ सांगली, कोल्हापूर भागात केळी पिकाखाली क्षेत्र वाढू लागले आहे. अलीकडे शेतकरी केळी पिकवण्याचे तंत्र म्हणजे रायपनिंग चेंबरचा (पिकवण कक्ष) वापर करू लागले आहेत. मात्र अल्पभूधारकांसाठी मोठ्या आकाराची चेंबर्स खर्चिक ठरतात असा अनुभव आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे (ता. हातकणंगले) येथे डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेंतर्गत कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यरत आहे. केव्हीकेने छोट्या शेतकऱ्यांची समस्या ओळखून छोट्या आकाराचे मात्र प्रभावी रायपनिंग चेंबर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या कक्षाची निर्मिती केली आहे. त्यात केळी पिकविण्याबाबत शिफारशी बाबत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत. रायपनिंग चेंबरचे तंत्र:- • चेंबर उभारणीसाठी खेळती हवा असलेल्या ठिकाणाची निवड • पीव्हीसी पाइप फ्रेमचा सांगाडा. चेंबर उभे केल्यानंतर जमिनीवर प्लॅस्टिक मॅट • सांगाड्यावर सिलपॉलीन घटकाचे नेटप्रमाणे आच्छादन. त्याची जाडी ०.३३ मिमी. • चेंबरमध्ये हवा खेळती राहील या प्रमाणे क्रेटसची थरांमध्ये मांडणी. • दोन थरांमध्ये हवा खेळती राहील अशी रचना असावी. • चेंबर उभारण्यासाठी पीव्हीसी पाइप, सिलपॉलींन घटक यासाठी सुमारे सात हजार रुपये खर्च. याशिवाय इथिलिन वायूच्या बारा सिलेंडरचा बॉक्स घ्यावा लागतो. त्याची किंमत दोनहजार रुपयांपर्यंत. केळी पिकण्याची प्रक्रिया:- • पक्व केळीच्या फण्यांची निवड • फण्यातील केळी ‘कोंब कटर’च्या साहाय्याने विलग करणे • या केळीला ०.२ टक्के शिफारसीत बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवणे. किंवा एक लिटर पाण्यासाठी • ४ ग्रॅम तुरटीचाही वापर करता येतो. त्यानंतर फळे कोरडी करून चेंबरमध्ये ठेवावीत. • प्लॅस्टिक क्रेटमध्ये ठेवून चेंबरमध्ये ३ ते ४ स्तराप्रमाणे रचावीत. • सुमारे ९० टक्के आर्द्रता निर्माण करण्यासाठी चेंबरच्या आंतरिक चारही बाजूस पाण्यात भिजविलेली सुती चादर वा गोणपाट टांगून घ्यावा आणि चेंबर बंद करावे. • विशिष्ट छिद्रातून बाहेरून सिलिंडर मधून १० ते १५ सेकंद इथिलिन वायू ( १०० पीपीएम) आत सोडावा • प्रति सिलेंडरच्या माध्यमातून दोन टन तर बारा सिलेंडरच्या साहाय्याने चोवीस टन केळी पिकू शकतात. • चेंबर ठेवलेल्या खोलीचे तापमान वातानुकूलित यंत्राच्या साहाय्याने २० अंश सेल्सियसपर्यंत ठेवावे. • इथिलीन वायू सोडल्यामुळे बारा तासांनी पुन्हा चेंबरचा पडदा २० मिनिटांसाठी उघडून ठेवावा. • जेणे करुन प्रक्रियेत तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर जाईल. वीस मिनिटांनी पुन्हा चेंबर बारा तासापर्यंत बंद ठेवावा. • पिकविल्यानंतर वजनात साधारणतः: १० ते १५ टक्के घट होऊ शकते. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
8
संबंधित लेख