कृषी वार्तालोकमत
अलर्ट! तर 15 मेनंतर 'व्हाट्स अप' चा करता येणार नाही वापर!
➡️ गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या पॉलिसीमुळे जोरदार चर्चेत आले आहे. ➡️ इन्संट मेसेजिंग व्हाट्सअ‍ॅप चे जगभरात कोट्यवधी युजर्स आहे. आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो. ➡️ गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या पॉलिसीमुळे जोरदार चर्चेत आले आहे. अनेकांनी या पॉलिसीला विरोध केला असून नव्या मेसेजिंग अ‍ॅप चा वापर करण्यासही सुरुवात केली आहे. ➡️ व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. १५ मे पूर्वी नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करावा लागले, अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यास समस्या येऊ शकते किंवा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंदही होऊ शकतं. ➡️ जानेवारी २०२१ मध्ये कंपनीने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही बदल केले होते. या पॉलिसीअंतर्गत युजर्ससाठी नवे नियम-अटी रोल आउट करण्यात आले होते. मात्र त्यावरून युजर्समध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. ➡️ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युजर्सला कंपनीच्या या पॉलिसीचा स्वीकार करावा लागेल. कारण ही पॉलिसी रिजेक्ट करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. व्हॉट्सअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी ८ फेब्रुवारी रोजी लागू होणार होती. परंतु ही तारीख वाढवून १५ मे करण्यात आली आहे. ➡️ १५ मे रोजी WhatsApp नवी पॉलिसी लागू करणार आहे. जर एखाद्या युजरने व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार केला नाही, तर युजर १५ मेनंतर व्हॉट्सअ‍ॅपवर कोणताही मेसेज पाठवू शकणार नाही किंवा मेसेज येणारही नाहीत. ➡️ 15 मेपूर्वी युजर्स अँड्रॉईड आणि आयफोनमधून आपली चॅट हिस्ट्री डाउनलोड करू शकतात. मात्र १२० दिवसांनंतर इनअ‍ॅक्टिव्ह अकाउंट्सची चॅट हिस्ट्री मेसेज, कॉल्स, फोटो, व्हिडीओ सर्व डिलीट होईल. ➡️ व्हॉट्सअ‍ॅप च्या नवीन प्राव्हेट पॉलिसी बाबत संपूर्ण देशभरातून विरोध करण्यात आला आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. नव्या पॉलिसीबाबत युजर्सकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ➡️ व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी सर्व युजर्सना स्वीकारावी करावी लागणार आहे. आपली खासगी माहिती, चॅट शेअर होण्याच्या भीतीने अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅप ला इतर पर्याय शोधले आहेत. मात्र व्हॉट्सअ‍ॅपने याचं खंडन करतं, प्रायव्हेट चॅट शेअर होणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ➡️ व्हॉट्सअ‍ॅप मध्ये आता लवकरच स्टेट्स प्रमाणे पाठवण्यात आलेले मेसेज २४ तासांत आपोआप गायब होणार आहेत. सध्या पाठवण्यात आलेले मेसेज सात दिवसांनंतर आपोआप गायब होतात. मात्र आता कंपनी यात बदल करणार आहे. ➡️ WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप iOS व्हर्जनमध्ये नवीन फीचरची टेस्टिंग केली जात आहे. या फीचर द्वारे पाठवण्यात आलेले मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर २४ तासांच्या आत गायब होणार आहेत. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
17
9
संबंधित लेख