AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अर्थसंकल्प - शेतकऱ्यांना मिळणार ६ हजार रू
कृषि वार्तासकाळ
अर्थसंकल्प - शेतकऱ्यांना मिळणार ६ हजार रू
नवी दिल्ली : अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंद देणारा आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दोन हेक्टर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच केली आहे.
याबाबत गोयल म्हणाले, गावचे गावपण टिकवून शहराप्रमाणे गावाला सोयीसुविधा देण्याचे ध्येय, शेतकऱ्यांना एमएसपीनुसार मुल्य देण्यात येत आहे, सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लागू केली आहे, दोन हेक्टर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये,प्रत्येकी २ हजारप्रमाणे तीन हफ्त्यांत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. संदर्भ - सकाळ, १ फ्रेबुवारी २०१९
86
0