AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अर्थसंकल्पातून महाराष्ट्र राज्यासाठी काय आहे?
समाचारMarathi abplive
अर्थसंकल्पातून महाराष्ट्र राज्यासाठी काय आहे?
"➡️आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. २०२२-२३ साठी सर्व राज्यांना मदत करण्यासाठी १ लाख कोटींची तरतूद आहे. एक लाख कोटी ही रक्कम राज्यांच्या एकूण गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणार आहे. हा निधी पुढील ५० वर्षांसाठी असेल यावर कुठलेही व्याज आकारले जाणार नाही. . ➡️पोस्ट ऑफिसमध्येही ऑनलाइन हस्तांतरण शक्य होणार असून पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग सेवेअंतर्गत येणार आहे. ७५ जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येणार आहे. २०२२ पासून पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंगवर काम केले जाईल. पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होणार आहे. ➡️जमिनीची कागदपत्रं डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन दिले जातील. तसंच जागांचं रजिस्ट्रेशन कागदपत्रांच्या आधारे कार्यालयात न जाता कुठूनही करता येईल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. ➡️किसान ड्रोन्सचा वापर आता शेतीमध्ये केला जाणार. हे कृषी ड्रोन्स पिकांची पहाणी करणे, जमीनीच्या नोंदी ठेवणे तसेच किटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरले जाणारे आहेत. ➡️२०२२ मध्ये 5G सेवा सुरू केली जाईल आणि गावांमध्ये ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. दूरसंचार क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी शोधल्या जातील. महत्वाचे - - ईलेक्ट्रिक वाहन बॅटरी अदलाबदली(exchange ) धोरण - देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार - ३.८ कोटी घरांमध्ये नळाचं पाणी - सौर ऊर्जा निर्मितीसाठी १९,५०० कोटी - राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख कोटींचे पॅकेज - स्टार्टअपसाठी २०२३ पर्यंत करसवलत - कपडे, चमड्याच्या वस्तू स्वस्त होणार - मोबाईलसह इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त होणार. संदर्भ:-Marathi abplive, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. "
87
7