AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात
कृषि वार्ताअॅग्रोवन
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात
कोकणातील हापूस व मराठवाडयातील केशर आंबा हा अर्जेटिनाला निर्यात करण्यात येणार आहे. या संदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, एप्रिल – मे महिन्यामध्ये पहिली कन्साईन्मेंट पाठविणार असल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी दिली. पवार म्हणाले, राज्यातील फळ भाजीपाल्याला जागतिक बाजारपेठ मिळावी, यासाठी पणन मंडळ सातत्याने प्रय़त्नशील आहे.
यासाठी कृषी हवामान विभागनिहाय विविध जिल्हयांमध्ये निर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहे. या माध्यमातून विविध फळे भाजीपाला विविध देशांमध्ये निर्यात केला जात आहे. आगामी हापूस आंब्याच्या हंगामासाठी निर्यातीची प्रक्रिया सुरू झाली असून, यंदा अर्जेंटिना या देशात निर्यात करण्यात येणार आहे. _x000D_ संदर्भ - अ‍ॅग्रोवन, २८ जानेवारी २०२० _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
14
0