AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अरे व्वा! दरमहा फक्त 1 रुपया खर्च करा अन् 2 लाखांचा फायदा!
समाचारNews 18 lokmat
अरे व्वा! दरमहा फक्त 1 रुपया खर्च करा अन् 2 लाखांचा फायदा!
➡️ आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीसाठी विमा ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मात्र गरीब कुटुंबांना विम्याचा हप्ता भरणे खूप कठीण जाते. अशा मंडळींसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. गरीब कुटुंबांची सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन सरकारने ही योजना आणली होती. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत अपघाताचे कवच वार्षिक 12 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच दरमहा फक्त 1 रुपया खर्च करून 2 लाखांचा फायदा मिळवता येणार आहे. जाणून घ्या, PMSBY साठी कसं करायचं रजिस्ट्रेशन? ➡️ सरकारच्या या योजनेत नोंदणी करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेला भेट देऊन अर्ज करू शकता. ➡️ PMSBY चे वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे म्हणजे फक्त 1 रुपये दरमहा आहे. दरवर्षी 31 मे पूर्वी प्रीमियमची रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप वजा केली जाईल आणि तुम्हाला 1 जून ते 31 मे या कालावधीसाठी संरक्षण मिळेल. या योजनेअंतर्गत विमाधारक व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला किंवा तो पूर्णपणे अपंग झाला तर त्याला 2 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? - 18 ते 70 वर्षांपर्यंत कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. - वयाची 70 वर्षे ओलांडल्यावर कव्हर समाप्त होईल. - या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. - प्रीमियमच्या कपातीदरम्यान खात्यात बॅलेन्स असणं गरजेचं आहे. - बॅलेन्स नसल्यास पॉलिसी आपोआप होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
8
इतर लेख