AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अरे वा! 'या' व्यवसायतुन होईल महिन्याला 3 लाखांपर्यंत कमाई!
कृषी वार्तालोकमत न्युज १८
अरे वा! 'या' व्यवसायतुन होईल महिन्याला 3 लाखांपर्यंत कमाई!
➡️ फार मोठी गुंतवणूक न करता एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुम्ही करत आहात का? मग मोत्यांची शेती हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यात सरकारकडून 50 टक्क्यांपर्यंत सबसिडीही मिळते. त्यामुळे मोत्यांची शेती करणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढीला लागली आहे. अनेक जण मोत्यांच्या शेतीतून लखपती बनले आहेत. ➡️ मोत्यांच्या शेतीसाठी एक तलाव, मोत्यांचं बीज आणि योग्य प्रशिक्षण यांची गरज असते. तलाव आपण आपल्या स्वतःच्या खर्चाने खोदू शकतो किंवा त्यासाठी सरकार 50 टक्के सबसिडी देतं, त्याचाही लाभ घेता येऊ शकतो. मोत्यांसाठी आवश्यक शिंपले अनेक राज्यांत मिळतात. दक्षिण भारतात आणि बिहारमधल्या दरभंगा इथल्या शिंपल्यांचा दर्जा चांगला असतो. मोत्यांच्या शेतीचं प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था देशात आहेत. मध्य प्रदेशात होशंगाबाद इथे आणि मुंबईतही मोत्यांच्या शेतीचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. मोत्यांची शेती कशी करायची? ➡️ सगळ्यात आधी शिंपले एका जाळीत बांधून 10 ते 15 दिवसांसाठी तलावात टाकले जातात. ते स्वतःसाठी अनुकूल वातावरण तयार करतात. त्यानंतर त्यांना बाहेर काढून त्यांची छोटीशी सर्जरी केली जाते. म्हणजे शिंपल्यांचं तोंड उघडून त्यात वाळूचा एक कण टाकला जातो. त्यावर शिंपल्यातला जीव स्रावांची अनेक आवरणं तयार करतो. त्यातूनच पुढे मोती तयार होत जातो. ➡️ एक मोती तयार होण्यासाठी 25 ते 35 रुपये खर्च येतो. एका शिंपल्यातून दोन मोती तयार होतात. एका मोत्याला कमीत कमी 120 रुपये दर मिळतो. दर्जा चांगला असेल, तर 200 रुपयांहूनही अधिक किंमत एका मोत्याला मिळू शकते. एक एकर क्षेत्रावरच्या तलावात 25 हजार शिंपले टाकलेले असतील, तर त्यासाठी आठ लाख रुपये खर्च येईल. त्यातील 50 टक्क्यांहून अधिक शिंपले सुरक्षित पद्धतीने हाती लागतील. त्यातून वर्षाला साधारणतः 30 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळू शकतं. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत न्युज१८ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
12
इतर लेख