AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अरे वा ! नवीन इलेक्ट्रिक स्कूटर देते , सिंगल चार्जवर 100 किमी रेंज !
ऑटोमोबाईलAgrostar
अरे वा ! नवीन इलेक्ट्रिक स्कूटर देते , सिंगल चार्जवर 100 किमी रेंज !
👉🏻इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी IVOOMI एनर्जी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे. या स्कूटरची डिलिव्हरी कंपनी जूनच्या मध्यापासून सुरू करण्यास असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या स्कूटरच्या खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्या लोकांसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. 👉🏻कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, S1 ई-स्कूटर ज्याला इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) कडून मंजुरी मिळाली आहे. या स्कूटरची डिलिव्हरी जूनच्या मध्यापासून केली जाईल. 👉🏻भारतात डिझाइन आणि निर्मिती केलेली 51 एक 2kW इलेक्ट्रिक मोटरद्वारे संचालित आहे, जी ताशी 50 54 किलोमीटरचा वेग प्रदान करते. 👉🏻इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 60V, 2kWh स्वॅपॅबल ली-आयन बॅटरी पॅक आहे, जो खूप कमी वेळेत बॅटरी चार्ज करतो. यामुळे घरात बॅटरी चार्ज करण्याच्या त्रासापासून दिलासा मिळतो. 👉🏻कंपनीच्या म्हणण्यानुसार, पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3-4 तास लागतात आणि एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली की, ती 100 किमी पर्यंत राइडिंग रेंज देते. 👉🏻ग्राहकांना 749 रुपयांमध्ये या ई स्कूटरची टेस्ट राइड प्री-बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. 👉🏻संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
56
5