AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अरे गजबच ! 999 रु मध्ये घरी आणा इलेक्ट्रिक बाईक !
ऑटोमोबाईलAgrostar
अरे गजबच ! 999 रु मध्ये घरी आणा इलेक्ट्रिक बाईक !
🏍️सर्वसामान्य लोकांना पेट्रोलच्या किमती परवडत नाहीत. त्यामुळे कित्येकजण इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहेत. बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी येत आहेत.आता एका कंपनीने एक भन्नाट बाइक बाजारात आणली आहे. 🏍️ 27 सप्टेंबर रोजी इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड मोटोवोल्ट ने आपली नवी ई-बाइक लॉन्च केली आहे. या बाइकला URBN e-bike असे नाव देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ही इलेक्ट्रिक बाइक केवळ 999 रुपयांत बुक करता येऊ शकणार आहे. 🏍️URBN e-bike ची वैशिष्ट्ये : ही इलेक्ट्रिक बाइक फुल चार्ज झाल्यानंतर तब्बल 120KM ची रेंज देते. कंपनीने या बाइकची किंमत केवळ 49,999 रुपये एवढी ठेवली आहे. ही बाइक मोटोव्होल्ट कंपनीच्या वेबसाइटवर आणि 100+ फिजिकल रिटेल पॉइंट्सवर 999/- रुपयांत बुक केली जाऊ शकते.ही बाइक आपण ईएमआयवरही खरेदी करू शकता. महत्वाचे म्हणजे ही बाइक चालविण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या लायसन्सची अथवा रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. 🏍️मोटोवोल्ट URBN मध्ये एक रिमूव्हएबल BIS-अप्रुव्ड बॅटरी आहे. हिला पेडल असिस्ट सेंसर देखील आहे. या बॅटरीमध्ये पेडल अथवा ऑटोमॅटिक मोडसह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या ई-बाइकची बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर, तब्बल 120KM पर्यंत रेंज देते, असा दावाही कंपनीने केला आहे. 🏍️या बाइकमध्ये इग्निशनचे स्विच, हँडल लॉक, रिअर आणि फ्रंट डिस्क ब्रेक, तसेच हाइड्रॉलिक रिअर शॉकर देण्यात आले आहे. URBN ई-बाइक एक स्मार्ट ई-सायकल आहे. जी एका इंटिग्रेटेड स्मार्ट फोन अॅपसह येते. हीचे वजन केवळ 40 किलो ग्रॅम एवढे आहे. तसेच हिची टॉप स्पीड 25 kmph एवढी आहे. हीची बॅटरी 4 तासांमध्ये पूर्ण होते. 🏍️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
8