AgroStar
अबब...! चक्क 30 रुपयाला एक केळी, फुलवली लाल केळीची शेती !
नई खेती नया किसानAgrostar
अबब...! चक्क 30 रुपयाला एक केळी, फुलवली लाल केळीची शेती !
🍌 औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका शेतकऱ्याने याच लाल केळीची शेती करत अवघ्या 60 झाडातून वर्षाला 2 लाखांचे उत्पन काढले आहे. विशेष म्हणजे ही एक केळ 30 रुपयाला मिळते. 🍌या केळीला मोठी मागणी आहे, याचे कारण म्हणजे ही केळी आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्वाची आहे. लाल केळी नियमित खाल्ल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. तसेच लाल केळी डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, त्यात पोटॅशिअम असल्याने हाडे बळकट होतात. यामुळे याची मागणी वाढते. 🍌तसेच लाल केळी खाल्ल्याने हेमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो आणि त्यात ट्रायटोफन असल्याने मन शांत राहते. आपण अनेक आजारांवर लाल केळी खाल्ल्याने मात करू शकतो. त्यामुळे बाजारात लाल केळीला मागणी आहे. 300 रुपये प्रतिकिलो विकणार लाल केळ 30 रुपयाला एक मिळते. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. 🍌एका झाडाला सरासरी 15 किलोचा घड लागतो आणि ही केळ 300 रुपये प्रती किलो विकली जाते. लाल केळीच्या 60 झाडातून सरासरी वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांचे होते. 🍌संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
14
इतर लेख