AgroStar
अबब...! इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होण्यापूर्वीच ७८०००, स्कूटरचं  बुकींग !
ऑटोमोबाईलAgrostar
अबब...! इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होण्यापूर्वीच ७८०००, स्कूटरचं बुकींग !
➡️भारताता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढतच जात आहे. यासोबतच इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्या देखील वेगानं आपला विस्तार करत आहेत. देश-परदेशातील कंपन्यांसोबतच अनेक स्टार्टअप उद्योग देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायात येत आहेत. यातच kWh Bikes कंपनीनं इलेक्ट्रिक मार्केटमध्ये दमदार एन्ट्री घेत Ola, Hero आणि Okinawa सारख्या कंपन्यांना टेन्शनमध्ये टाकलं आहे. kWh कंपनीनं केलेल्या घोषणेनुसार कंपनी २०२३ पर्यंत आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीला सुरुवात करेल आणि कंपनीला प्री-ऑर्डर देखील मिळाल्या आहेत. ➡️बंगळुरूच्या या स्टार्टअप कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांना तब्बल ७८ हजार इलेक्ट्रिक स्कूटरसाठीचं प्री बुकिंग मिळालं आहे. देशातील ७५ विविध डिलर्स या स्कूटरची विक्री करण्यासाठी तयार आहेत. कंपनीन या स्कूटरसाठीची प्री-बुकिंग फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सुरू केली होती. ➡️kWh कंपनीच्या स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात येत आहे आणि नॉर्मल सॉकेटमधून चार तासात बॅटरी संपूर्ण चार्ज होऊ शकते. संपूर्ण चार्ज झाल्यानंतर स्कूटर १२-१५० किमी रेंज सहज देऊ शकते. या स्कूटरची टॉप स्पीड ७५ किमी प्रतितास इतकी आहे. भारतीय परिस्थितीनुसार स्कूटरच्या निर्मितीत विशेष काळजी घेण्यात येत असल्याचंही संस्थापक सिद्धार्थ जंधू यांनी सांगितलं. ➡️ संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
2
इतर लेख