AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अन्नपदार्थाची निर्यात वाढविण्यासाठी लवकरच नवे धोरण
कृषी वार्ताअॅग्रोवन
अन्नपदार्थाची निर्यात वाढविण्यासाठी लवकरच नवे धोरण
नवी दिल्ली – देशातून प्रक्रियायुक्त अन्नपदार्थाची निर्यात वाढविण्यासाठी प्रभावी धोरणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी कृषी व प्रक्रिया अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण राज्य सरकारांशी चर्चा करत आहे. या नवीन धोरणाला निर्यातीसाठी विविध देशांसाठी लागणाऱ्या पिकांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांशी करार केले जाणार आहेत, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
देशातील शेतीमालाचे उत्पादन वाढले असले तरी, त्यावर होणारी प्रक्रिया व निर्यात अत्यंत कमी आहे. ही निर्यात वाढण्यासाठी प्रभावी अशा योजनेची आवश्यकता आहे. त्यासाठी कृषी व प्रक्रिया अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. अन्नपदार्थ निर्यात धोरण ‘असे’ असेल १. राज्यांसोबत सल्लामसलत करून राज्यकेंद्रित निर्यात २. धोरण ठरविणार निर्यातदारांना थेट शेतकऱ्यांशी जोडणार ३. निर्यातीतील संधींनुसार विशेषीकरण करणार ४. रसायनांच्या नियंत्रित वापराबाबत शेतकऱ्यांना जागरूकता करणे ५. निर्यातीसाठी त्या त्या देशांच्या रसायनांच्या कमाल अवशेष मर्यादा व त्यासंबंधीच्या निकषांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार सेंद्रिय शेतीमालाचे उत्पादनवाढीसाठी प्रयत्न ६. शेतीमालाच्या प्रमाणीकरणासाठी एन्ड-टू-एन्ड पातळीवर काम सुरू ७. शेतकऱ्यांना बांधावर प्रमाणीकरणाच्या सेवा देणार संदर्भ – अॅग्रोवन, १२ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
71
0