AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अन्नद्रव्यांचे पिकांमधील गंधकाचे महत्व
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
अन्नद्रव्यांचे पिकांमधील गंधकाचे महत्व
 पिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १७ अन्नद्रव्यांपैकी गंधक हे एक महत्वाचे दुय्यम अन्नद्रव्य आहे.  गंधकचा वापर प्रामुख्याने अन्नद्रव्यासोबतच कीटकनाशक व बुरशीनाशक म्हणून देखील केला जातो.  अन्नद्रव्यांमध्ये गंधक हे पिकाच्या वाढ व विकासासाठी महत्वाचे आहे. कारण प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये याची महत्वाची भूमिका आहे.
गंधक वापराचे फायदे:  पिकामध्ये तिखटपणा, तेलाचे प्रमाण, सुगंधीपणा, प्रथिने व साखरेचे प्रमाण वाढवण्यासाठी तसेच उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी गंधक उपयुक्त आहे. त्यामुळे कांदा, हळद, अद्रक, सोयाबीन, भुईमूग, ऊस व फळभाजीपाला यासारख्या पिकांमध्ये सुरुवातीपासून गंधकचा वापर करणे गरजेचे आहे.  गंधक हे पिकास नत्र, स्फुरद, फेरस, झिंक व बोरॉन या अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्यास मदत करते.  गंधक हे अन्नद्रव्य उष्णता निर्माण करते, त्यामुळे पावसाळ्यात जास्त ओलावा झाल्यास, जमिनीत लवकर वापसा येण्यासाठी याचा वापर करतात. त्याचबरोबर थंडीत पिकाला जमिनीतून उष्णता निर्माण करून देण्याचे काम करते. जेणेकरून पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होते. कीड रोग नियंत्रण:  गंधक हे भुरी रोग व लाल कोळी कीड नियंत्रणासाठी पिकात फवारले जाते. यासाठी गंधक ८०% @२ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणीसाठी वापरले जाते गंधक कमतरता लक्षणे:  पिकांत जर गंधकची कमतरता असेल, तर नवीन शेंड्याकडील पानांत देठाजवळून फिक्कट पिवळेपणा दिसून येतो.  ज्या जमिनींमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी आहे किंवा रेतीयुक्त जमिनीत याची कमतरता दिसून येते. गंधक वापरासाठी स्रोत:  गंधकच्या वापरासाठी आपण सुरुवातीला बेसल डोसमध्ये अथवा उभ्या पिकात देखील ड्रीपद्वारे व इतर खतांमध्ये बेनसल्फ ९०%, कोसावेट फर्टीस ९०%, सल्फामॅक्स ग्रोमोर ९०%, झुआरी गंधक ९०% यांसारख्या खतांचा वापर करू शकतो.  सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश, २०:२०:०:१३, विद्राव्य ००: ००:५० यांसारख्या खतांमधूनसुद्धा पिकास गंधक मिळते. काळजी:  गंधकमधून उष्णता निर्माण होत असल्यामुळे, उन्हाळयात पिकांमध्ये याचा वापर करणे टाळावा. संदर्भ –अग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
395
0