AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 अनुदान नक्की कुणाला मिळणार?
योजना व अनुदानAgroStar
अनुदान नक्की कुणाला मिळणार?
👉🏻शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज भरलेला असेल आणि आत्ता प्रतीक्षेत असाल कि आपल्याला सोलर पंप मिळणार कि नाही तर त्याआधी या योजनेची लाभार्थी निवडीचे पात्रता निकष बद्दल संपूर्ण जाणून घ्या. 👉🏻ज्यांनी कुसुम योजनेसाठी अर्ज भरलेला होता, त्यांना टेक्स्ट मेसेज आलेले आहे. कुसुम योजनेअंतर्गत निवड झालेल्या अर्जांना एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून स्वतः सर्वेक्षण करून लाभार्थी हिस्सा रुपये तेरा हजार चारशे रुपये भरणा ऑनलाईन सात दिवसाच्या आत जमा करायचा आहे. अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी कुसुम योजनेअंतर्गत निवड झालेल्या अर्जदारांना लाभार्थ्यांना आलेला आहे. 👉🏻कुसुम योजना महाराष्ट्र 2024 सौर कृषी पंप लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते? - अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार. - बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील. - ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील. - २.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल. 👉🏻कुसुम योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहितीसाठी सदर योजनेची ऑफिसियल वेबसाइट https://mnre.gov.in/ आहे , याला अवश्य भेट द्या. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
0
इतर लेख