समाचारAgrostar
अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मोफत अन्नधान्य!
✅राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी व महापुराचे थैमान सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे निराधार झालेल्या कुटुंबांना शासनाच्या आदेशानुसार मोफत अन्नधान्य व केरोसीनचा लाभ मिळणार आहे. महापुरामुळे उध्वस्थ झालेल्या कुटूंबाना यामुळे उभे राहण्यास मदत होणार आहे
✅महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, खेड, चिपळूण, महाड या भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
✅अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ लिटर केरोसीन मोफत पुरविण्यास महसूल व वन विभागाच्या ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.त्याअनुषंगाने या विभागाच्या ७ ऑगस्ट २०१९ च्या परिपत्रकान्वये अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थितीत अन्नधान्य वाटपाकरिता कार्यपद्धतीबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.महापुरामुळे कोकणात आणि विदर्भ मधील नुकसान झालेल्या लोकांना मदत जाहीर करण्यात आलीय आहे
✅महसूल यंत्रणेने पात्र ठरविलेल्या कुटुंबांनाच सदर अन्नधान्याचे वितरण करावयाचे आहे. त्यादृष्टीने महसूल यंत्रणेशी समन्वय साधून त्यांच्याकडून पात्र बाधित कुटुंबांच्या प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ लिटर केरोसिन मोफत वितरण तत्काळ करण्यात यावे असेही आदेशात म्हटले आहे.
✅संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.