AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले तर,मिळवा नुकसान भरपाई !
योजना व अनुदानAgrostar
अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले तर,मिळवा नुकसान भरपाई !
➡️पाऊस किंवा वादळामुळे तुमचे पीक नष्ट झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण अशा कोणत्याही परिस्थितीसाठी सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना चालवली आहे. परंतु अजूनही 70 टक्के शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नाही. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाऊस किंवा वादळामुळे नष्ट झालेल्या पिकांची भरपाई मिळते. ➡️अनेक वेळा शेतकरी कर्ज काढून पिकात पैसे गुंतवतो, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट होते. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पाऊस किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत उध्‍वस्त झालेल्या पिकांची भरपाई दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रीमियम भरावा लागतो. ➡️यामध्ये त्यांना खरीप पिकांसाठी विम्याच्या रखमेचा 2%, रब्बी पिकांसाठी विम्याच्या रखमेचा 1.5% प्रीमियम भरावा लागेल. तर व्यावसायिक बागायती पिकांसाठी विम्याच्या रखमेचा 5% प्रीमियम भरावा लागतो. या योजनेतील दाव्याचे प्रमाण 88.3 टक्के आहे. परंतु माहितीनुसार आजही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. म्हणूनच या योजनेच्या माहितीसाठी सरकारने अनेक कार्यक्रमही राबवले आहेत. ➡️अशी आहे अर्ज पद्धत : प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर (Apply as a Farmer) चा पर्याय निवडा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अर्ज काळजीपूर्वक भरा. तसेच हार्ड कॉपी काढा आणि सोबत ठेवा. यानंतर कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झाल्यास 88 टक्के पीक नुकसान भरपाई मिळवा. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
6
इतर लेख