AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अतिरिक्त ऊसापासून घेतले लाखोंचे ऊत्पन्न!
सफलतेची कथाTV 9 marathi
अतिरिक्त ऊसापासून घेतले लाखोंचे ऊत्पन्न!
➡️सध्या ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. यापूर्वीही ऊसाचे गाळप रखडल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.यावर मार्ग काडत कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील महादेव कवडे यांनी निवडलेली वेगळी वाट आज खऱ्या अर्थाने योग्य दिशेने असल्याचे दिसून येत आहे. ➡️कारखान्यांकडून ऊसतोडणीसाठी केली जाणारी टाळाटाळ आणि ऊस बिलासाठी होत असलेली फरपट याला त्रासून त्यांनी स्वता:च्या शेतामध्येच गुऱ्हाळ सुरु केले होते. यामधून केमिकलमुक्त गुळ तयार करुन लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांना दरवर्षी हंगामात मिळते शिवाय स्वत:च्या शेतामधील ऊसाचा विषयही निकाली निघाला आहे. ➡️कन्हेरवाडी येथील महादेव कवडे हे पारंपरिक पिकाप्रमाणेच ऊसाची लागवड करतात. त्यांना ऊसगाळपाच्या समस्येला तर 15 वर्षापूर्वीच सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आपल्या ऊसाचे गाळप आपणच करायचे असा निर्धार त्यांनी केले होते. पण कारखाना उभा करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल नसल्याने गुऱ्हाळ टाकण्याचा निर्धार केला होता. 5 गुंठ्यामध्ये हे गुऱ्हाळ टाकले असून गेल्या 15 वर्षापासून सुरु असून कवडे यांना याचा दुहेरी फायदा होत आहे ➡️टाकतानाच यामधून तयार होणारा गुळ हा केमिकलमुक्त असणार असा निर्धार त्यांनी केला होता. ज्याची मागणी त्याचेच उत्पादन हेच सूत्र त्यांनी अवलंबले म्हणूनच आज केवळ कळंब तालुक्यातच नाही तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि लातूर मध्ये या गुळाच्या ढेपीला मागणी सुरु झाली आहे. या अनोख्या प्रयोगातून घरच्या ऊसाचा तर प्रश्न मार्गी लागलाच पण कवडे यांच्या वर्षाकाठच्या उत्पादनात 5 ते 6 लाखांची भर पडली आहे. ➡️संदर्भ:-TV 9 marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
1
इतर लेख