AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
अटल बांबू समृध्दी योजना- नक्की काय आहे?
👉🏻राज्यात बांबू लागवडीला अनुदान देणाऱ्या अटल बांबू समृद्धी योजनेला सुधारित स्वरूपामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना बांबूच्या रोपा सोबतच खत पाणी देणे, संरक्षण इत्यादी बाबींसाठी अनुदान दिले जाणार आहे. आणि याच्या संदर्भातील महत्त्वाचा जीआर 28 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्यात आलेला आहे. 👉🏻या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रती हेक्टर 600 पर्यंत रोपे दिली जात होती. याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा अनुदान दिले जात नव्हतं, मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून बांबू लागवडीसाठी मोठे उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे आणि याच पार्श्वभूमीवर या योजनेमध्ये बदल करून शेतकऱ्यांना बांबूच्या रोपा सोबतच या विविध बाबींना अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर या योजनेकरिता किती अनुदान मिळणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
1
इतर लेख