योजना व अनुदानलोकमत न्युज १८
अटल पेन्शन योजनेबाबत एक नवी अपडेट!
अटल पेन्शन योजना - या योजनेचं नाव अटल पेन्शन योजना असं आहे. 2015 मध्ये केंद्र सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन लाभ प्रदान करणं आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 18 ते 40 वर्ष वयोगटातील लोकांचं भविष्य सुरक्षित करणं हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे आणि कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट असणं, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असणं अत्यावश्यक आहे. गुंतवणुकीनुसार दर महिन्याला मिळेल पेन्शन - • नियमानुसार, या योजनेत जमा करण्यात येणारा पैसा तुम्हाला 60 वर्षानंतर पेन्शन रुपात मिळणं सुरू होईल. पेन्शनची रक्कम 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि अधिकाधिक 5000 रुपये इतकी असू शकते. पेन्शन रुपात मिळणारा पैसा तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. • जर तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर, 5000 रुपये महिन्याचं पेन्शन हवं असेल, तर तुम्हाला दर महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील. याचा अर्थ दररोजच्या हिशोबाने तुम्ही 7 रुपयांची गुंतवणूक करता. • तसंच जर 1000 रुपये महिन्याला पेन्शन हवं असेल, तर दर महिन्याला केवळ 42 रुपये • 2000 रुपये पेन्शन हवं असल्यास, दर महिन्याला 84 रुपये • 3000 रुपये मासिक पेन्शनसाठी 126 रुपये आणि • 4000 रुपये पेन्शनसाठी 168 रुपये दर महिना भरावे लागतील. • अटल पेन्शन योजनेशी जोडलेल्या सर्व टॅक्सपेअर्सला इनकम टॅक्स अॅक्ट 80 C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट (Tax Benefit) मिळतो. त्याशिवाय स्पेशल प्रकरणात 50000 रुपयांपर्यंत अतिरिक्त टॅक्स बेनिफिट मिळतो. वेळेआधीच मृत्यू झाल्यास पेन्शन पत्नीला मिळेल - या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. जर एखाद्या व्यक्तीने अटल पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशन केलं असेल आणि पेन्शन सुरू होण्याआधीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीची पत्नी डिफॉल्ट रुपात नॉमिनी होते. पत्नीला योजनेचे संपूर्ण फायदे मिळतील. त्या व्यक्तीचं पेन्शन त्याच्या पत्नीच्या नावे दिलं जाईल. पत्नी हयात नसल्यास, त्या व्यक्तीने ज्याला नॉमिनी ठेवलं आहे, त्याला संपूर्ण फायदे मिळतील. संदर्भ:- लोकमत न्युज१८. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
1
5
इतर लेख