AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकतात दरमहा १० हजार!
समाचारलोकमत
अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकतात दरमहा १० हजार!
➡️ निवृत्तीनंतर आपली आर्थिक गरज कशी पूर्ण होणार? असा प्रश्न जर तुमच्यासमोर उपस्थित झाला असेल तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे. अटल पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या पती-पत्नींना पेन्शन स्वरुपात दरमहा १० हजार रुपये मिळू शकतात. यातून तुमच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजेचा प्रश्न सुटू शकतो. ➡️ पती-पत्नी अशा दोघांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त अटल पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशन करावं लागेल. यात पत्नी आणि पत्नी दोघांना यात ५ हजार रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर दोघांनाही निवृत्तीनंतरच्या काळात दरमहा १० हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळवता येणार आहे. पण या योजनेचा लाभ घेणाऱ्या पती-पत्नीचं वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे. या वगोगटातील दाम्पत्यालाच योजनेत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. यासोबत दोघांचंही बँकेत बचत खातं असणार अनिवार्य आहे. योजनेचे फायदे कोणते? > अटल पेन्शन योजनेअंतर्गत असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळतो. >अटल पेन्सन योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला दरमहा कमीत कमी १ हजार ते ५ हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळतात. > १८ ते ४० वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्याचं बँकेत बचत खातं असणं गरजेचं आहे. >अटल पेन्शन योजनेतील लाभार्थ्याच्या गुंतवणूकीपैकी ५० टक्के किंवा प्रतिवर्षी १ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल तितका वाटा केंद्राकडूनही लाभ स्वरूपात भरला जातो. > सरकारकडून दिलं जाणारं हे कॉन्ट्रीब्युशन आयकर भरणाऱ्या किंवा सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी लागू होत नाही. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
62
12
इतर लेख