AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अखेर दारे उघडणार; ज्ञानाची ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला!
समाचारLokmat
अखेर दारे उघडणार; ज्ञानाची ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला!
➡️ राज्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर धार्मिक स्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ऑक्टोबरपासून, तर ज्ञानाची मंदिरं असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. ➡️ मंदिरांच्या कळस दर्शनावर गेली कित्येक महिने समाधान मानाव्या लागणाऱ्या भक्तांना, तसेच शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. ➡️ आता गणेशोत्सवानंतर रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात कुठेही वाढ झालेली दिसली नाही.उलट रूग्णसंख्या कमी होत आहे. राज्याचा रूग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के असून बहुतांश लोकांचे लसीकरण झाले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आधीपासूनच प्रयत्न करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना उपस्थिती बंधनकारक नाही ➡️ मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसेल तसेच शाळेत येण्याची सक्ती करण्यात येणार नाही. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य राहील. अशा आहेत मार्गदर्शक सूचना - - एखादा विद्यार्थी आजारी असेल, त्याला आजाराची लक्षणे दिसत असतील तर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. - मुलांना गणवेशाची सक्ती नसेल. घरच्या कपड्यांवरही शाळेत जाता येईल. - प्रत्येक शाळेत शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक. विद्यार्थ्यांचे तापमान नियमितपणे तपासावे. - इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घ्यावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. मुलांना शाळेत पायी येण्यासाठी प्रोत्साहित करावे. - सॅनिटायझरचा वापर करावा. - विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाइन सादर करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही. - गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करून घ्यावा. मुलांना कमीतकमी पुस्तके/वह्या आणाव्या लागतील, अशी व्यवस्था असावी, असे सांगण्यात आले आहे. ➡️ धार्मिक स्थळे कधी उघडणार याबाबत उत्सुकता होती. अखेर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी समस्त भाविकांची इच्छापूर्ती केली आहे. धार्मिक स्थळे खुली करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासन येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर करण्याची शक्यता आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Lokmat, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
4
इतर लेख