नोकरीAgrostar
अंगणवाडी भरती प्रक्रिया होणार सुरु!
👉🏻वित्त विभागाने सेविका,मिनी सेविका व मदतनिसांची मंजूर पदांच्या संकेत रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.यापूर्वी काही जिल्ह्यात ही पदे ५० टक्के प्रमाणात भरली होती. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम जाणवत होता. त्यामुळे रिक्त असलेली पदे भरण्यास शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे. ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
👉🏻भरती प्रक्रियेच्या वेगळ्यावेगळ्या निकषानुसार ही पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असून भविष्यात मंजूर पदसंख्येच्या प्रमाणात रिक्त होणारी सर्व पदे भरण्याची प्रक्रिया नियमितपणे चालू ठेवावी, असे आदेश देखील शासनाने दिल्याने यापुढे रिक्त होणारी पदे वेळेत भरली जातील.
👉🏻भरली जाणारी पदे : अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका
👉🏻एकूण रिक्त पदे :२० हजार १८३ पदे
👉🏻याबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा : https://icds.gov.in/
👉🏻संदर्भ:-Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.