AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एस-टी मध्ये करता येणार मोफत प्रवास!
समाचारAgrostar
एस-टी मध्ये करता येणार मोफत प्रवास!
➡️मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का एस. टी. महामंडळाच्या स्मार्ट कार्ड बद्दल.ज्याद्वारे तुम्हाला एसटीमध्ये महाराष्ट्रात कुठेही मोफत फिरता येणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला एक कार्ड काढावा लागणार आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे 75 वर्षाच्या पुढील नागरिकाना म्हणजे ज्येष्ठ नागरिकना हा एसटी प्रवास मोफत प्रवास आहे. पण मित्रांनो स्मार्ट कार्ड जर काढले तर लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच एस टी मध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.आणि महाराष्ट्र मध्ये कुठेही फिरता येणार आहे. ➡️सध्या होत असलेल्या डिजिटल युगामध्ये एस टी महामंडळ सुद्धा मागे नाही. कारण की अगदी पास पासून ते आदर्श आधुनिक स्मार्ट कार्डची सुविधा नागरिकांना एस टी महामंडळ मार्फत देण्यात येत आहे. ➡️एसटी स्मार्ट कार्ड कोण काढू शकते? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे स्मार्ट कार्ड हे दिव्यांग बांधव तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच राज्य शासनाचा विविध पुरस्कार प्राप्त नागरिक व शालेय विद्यार्थी यांना काढता येते. त्यामुळे ज्या व्यक्तींकडे हे कार्ड असते अशाच व्यक्तींना एसटी महामंडळाच्या बस मध्ये सवलत देण्यात येते. ➡️स्मार्ट कार्ड बद्दल अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा. https://msrtc.maharashtra.gov.in/ ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
4
इतर लेख