AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पिकातील खोड किडीचे एकात्मिक नियंत्रण
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील खोड किडीचे एकात्मिक नियंत्रण
🌱भात पिकावरती विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. यातील खोडकिड ही एक मुख्य कीड असून, तिचे वेळीच नियंत्रण केले पाहिजे. उष्ण व दमट हवामानात किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो. अळी सुरूवातीस काही वेळ कोवळया पानांवर आपली उपजीविका करते. नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत म्हणजेच फुटवे येण्याच्या अवस्थेत किंवा पिक पोटरीवर येण्यापुर्वी झाला तर रोपाचा मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो, यालाच “गाभामर” असे म्हणतात. सुकलेला किंवा मेलेला पोंगा हाताने ओढला असता सहजासहजी निघून येतो. पोटरीतील पिकावर देखील खोडकीडीचा उपद्रव आढळुन येतो आणि त्यामुळे दाणे न भरलेल्या पांढ-या लोंब्रा बाहेर पडतात. यालाच पळींज किंवा पांढरी पिशी असे म्हणतात. परिणामत: भाताच्या उत्पादनात मोठया प्रमाणावर घट येते. 🌱नुकसान टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.  भात पिकाची जुलैच्या पहिल्या पंधरवड्या पर्यंत लागवड करावी.  शिफारशीनुसारच नत्रयुक्त खतांची मात्रा द्यावी. पिकामध्ये युरिया खताचा वापर करण्याऐवजी अमोनिअम सल्फेटचा वापर करावा.  पेरणीनंतर रोपवाटीकेमध्ये १५ दिवसांनी Fipronil 0.3% GR घटक असणारे अ‍ॅग्रोनिल-जीआर @ 1 किलो प्रति 100 चौ.मी क्षेत्रामध्ये वाळू सोबत फोकून द्यावे.  पुर्नलागवड करण्यापूर्वी रोपांचे शेंडे कापून लागवड करावी.  या किडींच्या प्रौढ पतंगांना आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा देखील वापर करावा. शक्य असल्यास पिकामध्ये प्रकाश सापळे लावावे.  रोपांची पुनर्लागवड झाल्यानंतर पिकाच्या अवस्थेनुसार अ‍ॅमेझ-एक्स @ 80 ग्रॅम किंवा फेम @ 60 मिली किंवा कोराजन @ 60 मिली प्रति एकर प्रमाणे या कीटकनाशकांची फवारणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
9
इतर लेख