AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
धान उत्पादकांना बोनस ऐवजी प्रति एकर मदत!
बाजार बातम्याअ‍ॅग्रोवन
धान उत्पादकांना बोनस ऐवजी प्रति एकर मदत!
➡️ महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी धान्य उत्पादक शेतकऱ्यांची ६०० कोटींची थकबाकी तातडीने मंजूर करून देण्याची घोषणा केली. ➡️ त्याचबरोबर धान्य उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी एकरी अनुदान देण्याच्या योजनेवर राज्य सरकार विचार करत आहे. म्हणजेच धान्य उत्पादक शेतकरी ज्या प्रमाणात धान्य पिकवतील त्या प्रमाणात त्यांना शासकीय मदत दिली जाईल. ➡️ राज्य प्रशासनाने धान्य खरेदी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आधारभूत भाव दिला जात आहे. मात्र यंदाचा बोनस अद्याप मिळालेला नाही. परंतू आता धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी प्रति एकर मदत थेट त्यांच्यापर्यंत कशी पोहोचावी यावर सरकार आता विचार करत आहे. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
10