AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी घडाची गुणवत्ता वाढ उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
केळी घडाची गुणवत्ता वाढ उपाय!
🌱केळी घड पुर्ण निसवल्यावर केळफूल वेळीच कापावे. घडावर 8 ते 9 फण्या ठेवून बाकी खालच्या फण्या धारदार विळीने सुरवातीलाच कापुन टाकाव्यात. फळांच्या आकारमानात सकारात्मक बदल होवून घड लवकर परिपक्व व्हावा, यासाठी फण्यांची वेळीच विरळणी करणे आवश्यक आहे. फुलकिडी या किडीचे नियंत्रणासाठी केळफुल बाहेर पडतेवेळी किंवा शेवटचे पान बाहेर पडताच डायमेथोएट 30 टक्के @ 1 मिली प्रति लिटर पाणी स्टिकरसह फवारणी करावी. अन्नद्रव्ये व्यवस्थापना मध्ये घड पुर्ण निसवल्यावर 13:00:45 @ 4 किलो व कॅल्शिअम नायट्रेट 4 किलो प्रति एकर याप्रमाणे ठिबकमधून आलटून पालटून द्यावे. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
8