AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
चक्क ..!मोबाइल च्या मदतीने जनावराचा गोठा केला थंडगार !
जुगाडAgrostar
चक्क ..!मोबाइल च्या मदतीने जनावराचा गोठा केला थंडगार !
🐄एकीकडे तरुण मुले, लहान मुले मोबाइलमुळे बिघडली असे आपण म्हणतोय मात्र काही मुले अपवाद असतात. याच मोबाइलचा वापर करून मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील १६ वर्षीय मुलाने शेतात अनोखा प्रयोग केला आहे आपल्या वडिलांना मदत म्हणून वातानुकूलित पंखे अन् फॉगरच्या साहाय्याने पाण्याची फवारणी करीत जनावरांचा गोठा थंडा थंडा कुल कुल केला आहे. 🐄मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील शिवाजी साळुंखे हे पशुपालन व्यवसायाकडे वळले त्यांचे बंधू शहाजी देशमुख हे देखीत शेती करतात शिवाजी साळुंखे यांनी आपल्या बंधूच्या शेतामध्ये मुक्त गोठा हा प्रकल्प सुरू केला आणि यामध्ये जर्सी जनावरांचे पालन सुरू केले त्यांचा मुलगा शुभम त्यांना कामात मदत करू लागता वाढत्या तापमानामुळे जनावरे आजारी पडून त्यांना ताप येऊ लागला परिणामी दूधदेखीत कमी येऊ लागले या समस्येवर काही करता येईल का, असा विचार करीत मोबाइलमध्ये यूट्युबच्या माध्यमातून जनावरांची निगा कशी राखावी याविषयीची माहिती पाहत असताना त्याला एका ठिकाणी याविषयी माहिती मिळाली अन् गोठयामध्ये उपलब्ध असलेल्या ड्रीपची पाइप, बैटरीवर चालणारा पंप घरातच उपलब्ध असणारे पंखे व पाच फॉगर ऑनलाइन मागवले आणि हा प्रयोग यशस्वी केला 🐄असा राबविता प्रोजेक्ट : चॅटरी पंपामध्ये साधारण वीस लीटर पाणी बसते आणि याच वीस लीटर बॅटरी पंपाच्या साह्याने त्यामध्ये पाणी ओतून त्याने हे फॉगर चालू केले विजेवरती तीन पंखे सुरू केल्यानंतर हा बॅटरी पप चालू केला की त्याती ड्रीपच्या पाइपमधून सर्वत्र जाते आणि तुषार सिंचनाप्रमाणे यामधील पाणी त्याचे तुषार कण उडू लागतात आणि यामुळे पूर्ण गोठ्यामध्ये थंड वाऱ्याची झुळूक निर्माण होते. 🐄फक्त २ हजारांचा आला खर्च : हा थंडगार गोठा तयार करण्यासाठी फक्त २ हजार रुपये खर्च आला असल्याचे शुभमने सांगितले शुभमचे सर्वत्र कौतुक होत आहे. 🐄संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0