AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी पिकातील पर्णगुच्छ रोग नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकातील पर्णगुच्छ रोग नियंत्रण !
🌱केळी पिकातील पर्णगुच्छ या रोगालाच बंची टॉप व्हायरस किंव्हा क्लस्टर टॉप या नावाने देखील ओळखले जाते. पिकाच्या कोणत्याही अवस्थेत या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव ग्रस्त झाडावरील पानांचा गुच्छ बनतो आणि वाढ खुंटते. रसशोषक किडींमार्फत या विषाणूजन्य रोगाचे वहन केले जाते आणि त्यामुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो. 🌱प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे शक्य नाही त्यामुळे प्रतिबंधात्मक नियोजन करण्यासाठी प्रमाणित व निरोगी रोपांची लागवड करावी, बागेभोवती काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची या पिकांची लागवड करू नये कारण विषाणूजन्य रोगांना हि पिके बळी पडतात. बाग नेहमी तण विरहित ठेवावी आणि रसशोषक किडींचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. 🌱 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
4