AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एरंड पिकांमधील उंट अळीचे जीवनचक्र
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
एरंड पिकांमधील उंट अळीचे जीवनचक्र
एरंडीमध्ये, उंट अळीमुळे सर्वात जास्त नुकसान होते, या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर या महिन्यात होतो. या अळ्या वेगवेगळ्या वनस्पतींवर उपजीविका करून राहतात. • अंडी अवस्था : - मादी पतंग पानांवर सुमारे ४५० निळ्या-हिरव्या रंगाचे गोलाकार अंडी घालते. पानांच्या दोन्ही बाजूला अंडी एक एकटे दिली जातात. अंडी गोल, हिरव्या पिवळ्या रंगाचे आणि व्यास ०.९ मिमी असतो. हि अंडी २ ते ५ दिवसात उबतात. • अळी अवस्था :- अळ्या अंड्यातून बाहेर आल्यानंतर पिवळसर हिरव्या रंगात फिकट तपकिरी डोके आणि ३.५ मिमी. असते तर पूर्ण विकसित झालेली अळी तपकिरी आणि ६० ते ७० मिमी लांबीची असते. हि तिच्या अळी अवस्थेत पाच त्वचा सोडते. अळीचा कालावधी १२ ते १३ दिवसांचा असतो.
• कोषावस्था:- कोषाचा रंग तांबूस तपकिरी असतो, त्याची लांबी सुमारे ०.२५ इंच असते. हे गळून पडलेल्या पानांच्या दरम्यान किंवा कधीकधी झाडावर वाकलेल्या पानांच्या दरम्यान असतात. कोषावस्था १० ते २७ दिवसांपर्यंत असते._x000D_ • प्रौढ/पतंग: - प्रौढ किडी २ इंच पंखांनी लांब ५/८ इंच लांब असतो. पुढील पंख तपकिरी असून काळेआणि पांढरे चमकदार ठिपके असतात. मादी कोषावस्थेतून निघाल्यानंतर २ ते ५ दिवसानंतर अंडी देण्यास सुरवात करते._x000D_  नुकसानीचा प्रकार:-_x000D_ • अळी पाने आणि संपूर्ण पीक देखील नष्ट करू शकतात._x000D_ • पानांमध्ये विकृती येते._x000D_ • मोठी अळी पाने, कोंब आणि शिरा देखील खाते._x000D_  नियंत्रण:- _x000D_ • सुरवातीच्या अवस्थेत अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात._x000D_ • पिकात अंडी आढळून आल्यास कडुनिंब अर्क किंवा निलगिरी अर्क ४% फवारणी करावी._x000D_ • प्रति एकरी ८ ते १० 'टी आकाराचे' सापळे स्थापित करावे._x000D_ • डायमेथोएट ३०.००% ईसी @४६२ मिलि किंवा मॅलेथिऑन ५०.००% ईसी @८०० मिली प्रति २०० लीटर पाण्यात मिसळून प्रति एकरी फवारणी करावी._x000D_ संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स _x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!_x000D_ _x000D_
64
3