AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जाणून घ्या, आपल्या भागातील हवामान!
हवामान अपडेटAgrostar
जाणून घ्या, आपल्या भागातील हवामान!
➡️राज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानात मोठा बदल झालेला दिसून आला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ➡️हवामान तज्ञ यांनी दिलेल्या अंदाजानुसार, 5 मार्चपासून नंदुरबार धुळे, जळगाव, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, माजलगाव, शिरूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ➡️त्यामुळे शेतीतील रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांची लवकरात लवकर काढणी करून घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर या कालावधीत पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागात देखील पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ➡️ एकंदरीत 5 ते 10 मार्च दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकांची लवकरात लवकर हार्वेस्टिंग करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
5
इतर लेख