AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पुढील ४८ तासात या ठिकाणी पावसाची शक्यता!
हवामान अपडेटन्यूज १८ लोकमत
पुढील ४८ तासात या ठिकाणी पावसाची शक्यता!
➡️सध्या अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होतं आहे. सुदैवाची बाब म्हणजे हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. असं असलं तरी कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम जाणवत आहे. ➡️याच पार्श्वभूमीवर आज आणि उद्या (८ आणि ९ नोव्हेंबर) कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ४८ तास कोकणासाठी महत्त्वाचे आहेत. ➡️रविवारी सकाळपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी मुंबईसह कोकण आणि गोव्यात बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. ➡️पुढील दोन दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. मुंबईसह कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ➡️त्यामुळे पुढील 48 तास कोकणासाठी महत्त्वाचे आहेत.रविवारी संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण होते. याचा प्रभाव पुढील दोन दिवस कायम राहणार असून ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होत आहे. परिणामी अरबी समुद्रात ८, ९ आणि १० नोव्हेंबर रोजी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ➡️अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग ताशी ८० ते ९० किमी इतका राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे. यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
62
8
इतर लेख