AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
लिंबू लागवड तत्रंज्ञान
• प्रथम लिंबाची रोपे बियाण्यांपासून तयार केली जाते. बियाणे लागवडीसाठी बेड तयार करून रोपांची वाढ केली जाते हि रोपे लागवडीपासून दोन महिन्यांत पुर्नलागवडीसाठी तयार होतात. • रोपे कलम करण्यासाठी ४-५ महिन्यांचा कालावधी लागतो. • मुख्य शेतात रोपे लावल्यानंतर एका वर्षापासून, वसंत ऋतूमध्ये रोपांची छाटणी करता येते, छाटणीत नको असलेल्या फांद्या काढून टाकल्या जातात, जमिनीला टेकलेल्या फांद्या व मुख्य फांद्यावर आलेल्या उपफांद्या कापून काढल्या जातात. • झाडाच्या योग्य वाढीसाठी ३-४ वेळा खतांची मात्रा दिली जाते. • तसेच किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची देखील पिकावर फवारणी केली जाते. • तिसर्‍या वर्षापासून लिंबाच्या झाडाला फळे लागणे सुरु होते. जेव्हा फळे चांगली आकार, काढणीयोग्य होतात तेव्हा त्यांची काढणी केली जाते आणि प्रक्रियेसाठी प्रोसेसिंग युनिटकडे पाठविली जातात.
संदर्भ:- नोअल फार्म हा व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
214
8