AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकातील मर समस्येवर उपाययोजना!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हरभरा पिकातील मर समस्येवर उपाययोजना!
हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्वाचे कडधान्य आहे. हरभरा पिकाच्या उत्पादनात कमी होण्याचे मुख्य करणे हरभाऱ्याला होणारे बुरशीचे रोग आणि त्याला लागणारी किड आहे त्यामुळे हरभरा वाढिच्या वेळेला मर, मानकुजव्या, मुळकुज सारखे रोगचे लंक्षणे ओळखून नियंत्रण करने फार गरजेचे आहे. मर रोग व्यवस्थापन- मर रोग फ्युजारियम ऑक्‍सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमीनी मधुन आणी बियाव्दारे होतो. हा झाडाची अन्नद्रव्य वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारतो. मर रोगाची बुरशी 6 वर्षापर्यंत जमीन जिवंत राहू शकते. पण ज्या भागात हवामान जादा थंड राहते तेथे याचा प्रार्दुभाव कमी दिसतो. लक्षणे- 👉 झाडाचा जमिनी वरचा भाग, देठ आणी पाने सुकतात व झाड वाळून मरते . 👉 कोवळी रोप सुकतात. 👉 रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद दिल्यास फिकट तांबुस काळसर रंग दिसून येतो. व्यवस्थापन 👉 जमिनीची खोल नांगरणी करावी व जमीन किमान एक महिना उन्हात तापवून घ्यावी, 👉 वेळेवर पेरणी करावी. 👉 मोहरी किंवा जवस आंतरपिक म्हणून घ्यावेत.👉पीक फेर पालट करावे (एकाच शेतात सतत हरभरा घेऊ नये ) 👉 रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा. 👉 पीकेव्ही, हरिता, बीडी एन जी ७९७, दिग्विजय, जेएससी ५५ नियंत्रण- 👉 लागवडीपूर्वी विटावॅक्स पॉवर @3 ग्रॅम/किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते. 👉 तसेच हा प्रादुर्भाव दिसून आल्यास शिफारशीनुसार बुरशीनाशकाचा वापर फवारणीत करावा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
33
7
इतर लेख